कोल्हापूर : केनवडे (ता. कागल) येथील श्री अन्नपूर्णा शुगर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. कारखान्याने १ लाख ८३ हजार ८८४ टन उसाचे गाळप केले. ट्रॅक्टर व बैलगाडी चालकांनी उत्साहात वाजत गाजत मिरवणुकीने उसाची हंगामातील शेवटची फेरी कारखान्याकडे पोहोच केली. गळीत हंगामाच्या सांगता मिरवणुकीत अन्नपूर्णा शुगरचे संस्थापक-अध्यक्ष संजय घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, विरेन घाटगे, संचालक के. के. पाटील, आनंदा साठे सहभागी झाले होते.
संजय घाटगे म्हणाले, गळीत हंगामात कारखान्याने १ लाख ८३ हजार ८८४ टन ऊसाचे गाळप केले. पुढील गळीत हंगामात अडीच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी संचालक मंडळावर विश्वास ठेवून गाळपासाठी ऊस दिला. तोडणी वाहतूक कंत्राटदार, ऊसतोड मजूर, कारखान्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हंगाम यशस्वी केला. शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी यांनी स्वागत केले. यावेळी ऊस पुरवठा अधिकारी सुनील देसाई, संजय सांगावे, गजानन पाटील, साईराज बेनके, संजीव नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कृष्णात कदम, शिवराज भरमकर, बाजीराव पाटील, धोंडिराम एकशिंगे उपस्थित होते. युवराज कोईगडे यांनी आभार मानले.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.