कोल्हापूर: भुदरगड तालुक्यातील तांबाळे येथील अथणी शुगर्स भुदरगड युनिटने संस्थापक श्रीमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास कार्यक्रमाला गती दिली आहे. यावर्षी ऊस पीक परिस्थिती व चांगले पाऊसमान याचा विचार करता अथणी शुगर्स प्रशासनाचा ४.५० लाख मे. टन गाळप करण्याचा मानस आहे, अशी माहिती चिफ इंजिनिअर नामदेव भोसले यांनी दिली. हंगाम २०२४-२५ चा मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम भोसले यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
गळीत हंगाम २०२४-२५ साठी कारखान्याने ४५० ट्रक व ट्रॅक्टर वाहन यंत्रणा उभी केली आहे. शेती विभागाकडे आठ हजार हे. आर. ऊस क्षेत्र नोंद झाले आहे. कारखान्याची सर्व मेन्टेनन्सची कामे प्रगतिपथावर असून, हंगाम नियोजित वेळेत सुरू होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक ऊस उत्पादन घेता यावे, यासाठी ऊस विकास विभागाने सर्व विभागानुसार डेमो प्लॉट घेतलेले आहेत असे सांगण्यात आले. यावेळी यावेळी चीफ केमिस्ट प्रकाश हुडुरे, शेती अधिकारी राजू आमते, चिफ अकाऊंट जमीर मकानदार, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब देसाई, कन्हैया गोरे, शिवाजी खरुडे, मुराद काझी, अमृत कळेकर, स्टोअर किपर दिलीप गायकवाड, पर्यावरण अधिकारी सतीश पाटील, सुरेश देसाई, साताप्पा कल्याणकर, अरुण देसाई, राजाराम भारमल, जनार्दन देसाई आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.