कोल्हापूर: आसुर्ले-पोर्ले, (ता. पन्हाळा) येथील श्री दत्त दालमिया भारत शुगर कंपनीच्या बॉयलरचे अग्निप्रदीपन डी.जी.एम. इंजिनिअरिंग शिवप्रसाद पडवळ आणि गीता पडवळ यांच्या हस्ते झाले. यावेळी युनिट हेड एस. रंगाप्रसाद, एच. आर. प्रमुख सुहास गुडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री दत्त दालमिया भारत शुगर कंपनीने विश्वासार्हता निर्माण केली आहे. या वर्षी ११ लाख ५० हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे प्रतिपादन युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी केले. यावेळी शेती अधिकारी संग्राम पाटील, मणिकंदन, मनीष अग्रवाल, नीलेश पाटील, सुंदर रेड्डी, श्रीकांत मुक्कर, संभाजी भोसले, कणकबसई, संगमेश्वर, नितीन कुरळुपे आदींसह कामगार संघटनेचे विलास शिंदे, एम. एम. पाटील, प्रकाश चौगुले आदी उपस्थित होते. आभार रामचंद्र घराळ यांनी मानले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.