कोल्हापूर : वारणा कारखान्याकडून प्रतिटन ३२२० रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय : अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे

कोल्हापूर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२२० रुपये प्रमाणे पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला. सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या ३० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला असल्याचे वारणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.

गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये मार्च महिन्यात येणाऱ्या उसाला प्रतिटन ३४०० रुपये दर देणार असल्याचे, तसेच कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे बुलेट व स्प्लेंडर मोटारसायकलच्या लकी ड्रॉ ची प्रोत्साहनपर बक्षीस योजना याही वर्षी चालू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आजअखेर एकूण २ लाख ४६ हजार ९१५ टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. सभासद व गेटकेन ऊस पुरवठादार यांनी ऊस वारणा पुरवठा करून गाळपाचे १६ लाख मे. टनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here