कोल्हापूर : ऊस तोडणी लांबल्याने वजनात घट; शेतकऱ्यांसह कारखान्यांना फटका

कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. काही कारखाने येत्या आठवडाभरात तर काही कारखाने १० ते १२ दिवसांत हंगाम समाप्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या मजुरांच्या कमतरतेमुळे तोडणी लांबली आहे. ऊस कारखान्याला घालवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक सुरु आहे. ऊसाच्या वजनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. सद्यस्थितीत बिद्री सहकारी साखर कारखान्याने ११ लाख ३ हजार ५०० पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा साखर उतारा १३.४० टक्के आहे. याचबरोबर संताजी घोरपडे कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून उसाला चांगला दर मिळत असल्याने लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, तोडणी मजुरांच्या टोळ्यांची संख्या कमी झाली आहे. टोळ्यांनी पळून जाणे, ॲडव्हान्स बुडवणे यामुळे ट्रॅक्टर चालक, शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. ऊस पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती टन १०० ते २०० रुपये खर्च आला आहे. मग ऊस शेती परवडायची कशी? असा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here