कोल्हापूर : सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त लिंगनूर-कापशीत ‘ऊस शेती तंत्रज्ञान जागृती अभियान अंतर्गत मेळाव्याचे आयोजन केले होते. या अंतर्गत कारखान्यामार्फत ऊस पिकावर ड्रोनने औषध फवारणीचे प्रात्यक्षिक प्रगतशील शेतकरी विष्णू मडके यांच्या शेतावर घेण्यात आले. त्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी ऊस उत्पादन वाढीसाठी जमिनीची निवड, बेणे निवड, प्रक्रिया, रासायनिक खतांचा व हिरवळ खतांचा वापर, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पाणी कमी अथवा मुबलक असले तरी उसाच्या अधिक उत्पादनासाठी ठिबक सिंचनचाच वापर करावा, असे आवाहन जैन इरिगेशनचे कृषी विद्यावेत्ता सुरेश मगदूम यांनी केले. संचालक विश्वासराव कुराडे यांनी प्रास्ताविक केले. संचालक वीरेंद्र मंडलिक यांनी विविध योजनांची माहिती दिली. नंदकुमार घोरपडे, शहाजी यादव, भगवान पाटील, प्रमोद कुराडे, मारुती ड्रोनचे राजवर्धन पाटील आदी उपस्थित होते. सशांत जाधव यांनी आभार मानले.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.