कोल्हापूर : कुंभी – कासारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डिस्टिलरी प्रकल्प विस्तारीकरण व कारखाना आधुनिकीकरणास मंजुरी देण्यात आली. कारखान्याची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार तथा कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यस्थळावर खेळीमेळीत झाली. यावेळी केंद्र सरकारने साखरेला ५० रुपये प्रती किलो हमीभाव द्यावा, अशी मागणी नरके यांनी केली. सभेत ठेवी स्वीकारणे, शेतकरी कार्यशाळा, माती परीक्षण, ऊस तोडणी, यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
चेअरमन नरके म्हणाले, भविष्यात इथेनॉलला मागणी वाढेल. त्यासाठी गाळप क्षमता वाढविल्यास सभासदांचा ऊस बाहेरच्या कारखान्यांना जाणार नाही. डीपीआरप्रमाणे डिस्टिलरी विस्तारीकरणासाठी ११५ कोटी रुपये खर्च येईल. गाळप क्षमता ५,००० वरून ८,००० मे. टनापर्यंत विस्तारीकरणास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्यात आली. शुन्य प्रदूषणसाठी विस्तारीकरण गरजेचे आहे. यावेळी प्रशांत पाटील यांनी नोटीस वाचन व वृत्तांत वाचन केले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे व यशवंत बँकेचे संचालक अमर पाटील- शिंगणापूरकर, बाजीराव देवाळकर व पांडुरंग शिंदे, जोत्स्ना पाटील, किरण पाटील, गोकुळचे संचालक अजित नरके, राजेंद्र सूर्यवंशी, एकनाथ पाटील, बाजीराव पाटील, कुंडलिक पाटील, किरण पाटील, दत्ता पाटील, विष्णू पाटील, के. डी. पाटील, नारायण पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. एस. आर. पाटील, देवराज नरके, राजवीर नरके आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष राहुल खाडे यांनी आभार मानले.