कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यांने सन २०२४-२५ गळीत हंगामात १३.५३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांना प्रति टनाला अर्धा किलो (५०० ग्राम) साखर दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अशोक कातराळे यांनी केले. ते कारखान्यातर्फे सभासदांना साखर कार्ड वितरण कार्यक्रमात बोलत होते.
कातराळे म्हणाले अकिवाट सर्कल अंतर्गत येणाऱ्या शिरगुप्पी, जुगुळ, मंगावती शहापूर, मोळवाड, इंगळी, मांजरी चंदूर, येडूर येथील सभासद, शेतकऱ्यांना साखर कार्ड वितरित केले जात आहे. यावेळी कारखान्याचे संचालक संजयकुमार कोथळे, अभयकुमार आकिवाटे, आप्पासाहेब पाटील, तात्यासाहेब चौगुले, पारिसा पुदाले, भरत लांडगे, भरत मदभावी, सुरज नरवाडे, संदीप कात्राळे यांच्यासह सभासद, शेतकरी उपस्थित होते.