पुणे : महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप सुरू आहे. साखर आयुक्तालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सात फेब्रुवारी २०२१ पर्यंत राज्यातील १८३ कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात आतापर्यंत ६८९.२८ टन उसाचे गाळप झाले आहे. तर ६९२.९८ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
आतापर्यंत कोल्हापूर विभागामध्ये ३७ साखर कारखाने सुरू आहेत. कोल्हापूर विभागाचा साखर उताराही वाढून साडेअकरा टक्क्यांपुढे पोहोचला आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा ११.६४ टक्के इतका आहे.
दरम्यान, राज्यामध्ये सोलापूर विभागात सात फेब्रुवारी २०२१ अखेर सर्वाधिक ४१ साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे.