कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. सोलापूर आणि कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी ऊस संपल्याने कारखाने बंद करण्यास सुरुवात केली आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ५ मार्च २०२१ पर्यंत सोलापूर विभागातील २५ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागात २ कारखाने बंद झाले आहेत. महाराष्ट्रात एकूण ३२ कारखान्यांचे कामकाज आटोपले आहे.
साखरेच्या उताऱ्यामध्ये कोल्हापूर विभागात सर्वात आघाडीवर आहे. कोल्हापूरमध्ये साखरेचा उतारा १२ टक्क्यांच्या आतपास आहे. साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, ५ मार्चपर्यंत कोल्हापूर विभागाचा उतारा ११.८८ टक्के आहे.
या हंगामात कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखान्यांनी गाळपामध्ये सहभाग घेतला. सोलापूर विभागात ५ मार्चअखेर ४१ कारखाने गाळप करीत होते.
राज्यात १८१ साखर कारखान्यांनी ५ मार्चपर्यंत गाळप केल्याची माहिती साखर आयुक्तालयाने दिली. राज्यात ८५४.९३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. एकूण ८८४.४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३४ टक्के इतका आहे.