कोल्हापूर विभाग साखर उत्पादनात राज्यात अव्वल

कोल्हापूर : राज्यात आता गतीने गाळप हंगाम सुरू आहे. हंगाम सुरू होऊन महिना उलटला असून आतापर्यंत ३ कोटी ४० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल ७७ लाखांनी गाळप कमी झाले आहे. साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर विभागात 37 साखर कारखान्यांनी 68.19 लाख टन उसाचे गाळप आणि 66.73 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कोल्हापूर जिल्हा 9.79 सरासरी उताऱ्यासह राज्यात आघाडीवर आहे. साखर आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 20 डिसेंबर 2023 अखेर 332.27 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. सध्या राज्यात गाळप पूर्ण क्षमतेने सुरु असून 8.6 च्या सरासरी उताऱ्याने 285.88 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

राज्यात यंजा नागपूर, कोल्हापूर, सांगली वगळता इतर ठिकाणी गळीत हंगाम वेळेत सुरू झाला. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे दोन जिल्ह्यांत हंगाम लांबणीवर पडला. सद्यस्थितीत ७७ लाख २१ हजार टन गाळप करून पुणे विभाग आघाडीवर आहे. मात्र, साखर उताऱ्यात ९.८३ टक्के राखत कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. आतापर्यंत राज्यातील १९४ कारखान्यांनी ३ कोटी ४० लाख ४३ हजार टनांचे गाळप झाले आहे. सरासरी ८.६३ टक्के साखर उताऱ्यातून २ कोटी ९३ लाख ७९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here