कोल्हापूर : दत्त कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ दत्त विकास पॅनलतर्फे बेळगाव जिल्ह्यातील बोरगाव, कारदगा, जनवाड, चाँद शिरदवाड, बेडकिहाळ, भोज, आदी भागांत संवाद दौरा झाला. यावेळी झालेल्या सभासद संवादामध्ये ‘अरिहंत उद्योग समूहा’चे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी राजकारणविरहित आणि राजकारणापलीकडे जाऊन काम करण्याची भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांनी दत्त कारखाना चांगल्या रीतीने चालविला आहे. सत्तारुढ दत्त विकास पॅनल निवडून आणण्याचा निर्धार सभासदांनी करावा, असे आवाहन केले.
यावेळी चेअरमन गणपतराव पाटील यांनी, कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना, शेअर्स रक्कम व उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण विकासाची भूमिका विशद केली. इंद्रजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष अरुणकुमार देसाई, सिदगोंडा पाटील, जयपाल नागावे, अशोक बंकापुरे, पिरगोंडा पाटील, राजू मगदूम, मनोज पाटील, अभय करोले, भुजगोंडा पाटील, धन्यकुमार पाटील, राजेंद्र फिरंगण्णावर, आदी उपस्थित होते. अभय मगदूम यांनी स्वागत केले. शरदचंद्र पाठक यांनी आभार मानले.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.