कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. २१ सदस्यांच्या निवडीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होईल. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे मुख्य दावेदार, माजी मंत्री सतेज पाटील आणि सत्ताधारी भाजपचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. आणि ते शेतकऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. कारखान्यावर ताबा मिळविण्यासाठीची ही लढाई दोन्ही पक्षांसाठी एक प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. दोघेही कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. राजाराम सहकारी साखर कारखाना कोल्हापूर महानगरपालिकेच्या सीमेवरील एकमेव कारखाना आहे. येथे दरवर्षी चार लाख टन ऊसाचे गाळप केले जाते.
कारखान्याची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार होती. मात्र, नोंदणीकृत मतदारांविषयी कायदेशीर लढाईमुळे अनेकदा त्यास स्थगिती मिळाली. नोंदणीकृत मतदारांवर पाटी यांनी आक्षेप घेतला होता की, महाडिक यांनी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदस्य म्हणून नोंदवले आहे. असे सभासद कारखान्याला ऊस पुरवठाही करीत नाहीत. कारखान्यात एकूण १५,५३८ शेतकरी मतदान करतील.