कोल्हापूर : बांबवडे- सोनवडे (ता. शाहूवाडी) येथील उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी या निवडणुकीसाठी ३४ अर्ज दाखल झाले होते. मात्र, अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी १३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे २१ जागांसाठी २१ अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. चेअरमन मानसिंगराव गायकवाड यांनी नवीन-जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत मार्ग काढला. रणवीरसिंग गायकवाड यांनी सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने गटात उत्साहाचे वातावरण आहे.
कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव गायकवाड म्हणाले की, सभासदांनी दाखविलेला विश्वास व कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे सभासद, ऊस उत्पादक यांचे हित जोपसता आले.’ बिनविरोध निवडलेले उमेदवार असे : मानसिंगराव गायकवाड, रणवीरसिंग गायकवाड, महादेवराव पाटील, सुरेश पाटील, राजाराम थोरात, ललिता कांबळे, बेबीताई पाटील, किरण चौगुले, रविराज कोकरे, शंकरराव पाटील, विठ्ठल पोवार, राजाराम थोरात, विठ्ठल पोवार, गणपती पाटील, शंकरराव पाटील, सुरज सावंत, अमित पाटील, विश्वजित इनामदार, शामराव लाळे, राजाराम चव्हाण, पृथ्वीराज खानविलकर, दत्तात्रय पाटील, अजित पाटील. ललिता कांबळे, किरण चौगुले, बेबीताई पाटील, गणी ताम्हणकर, रविराज कोकरे- देसाई.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.