कोल्हापूर – गडहिंग्लज कारखान्याच्या विस्तारीकरणासह इथेनॉल प्रकल्प उभारणार : अध्यक्ष प्रकाश पताडे

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थसाहाय्य आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या आगामी हंगामासाठी गाळप, आसवणी विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्पाच्या उभारणीस निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मक भूमिका घेतली आहे. लवकरच काम सुरू होणार आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण व संचालक मंडळांनी पत्रकार परिषदेत दिली. कारखान्याची मील, टर्बाईन, बॉयलर, बॉयलिंग हाऊस आदी विभागांचे आधुनिकीकरण करून गाळप क्षमता प्रतिदिन २००० ऐवजी ३५०० टन करण्याचे नियोजन आहे.

प्रकाश पताडे म्हणाले, आसवनी प्रकल्पही २५ ऐवजी ६० केएलपीडीचा करणार आहे. स्वतंत्र इथेनॉल प्रकल्पाची उभारणी होणार असून, या सर्वांसाठी केडीसीसी बँकेकडे ६० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव दिला, असे त्यांनी सांगितले. पताडे म्हणाले की, २०१३-१४ पासून सातत्याने मुश्रीफ यांनी अडचणीतील गोडसाखर कारखान्याला मदत केली आहे. कारखाना पुन्हा अडचणीत आल्याने संचालकांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन विनंती केल्याने कारखान्याला अर्थसाहाय्य मिळाले. म्हणून २०२४-२५ चा गळीत हंगाम सुकर झाला. वर्षभरात कामगारांचे थकीत पगार, सभासदांना सवलतीची साखर वाटप, मशिनरीची कामे, तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण झाले आहेत. यावेळी संचालक सतीश पाटील, विद्याधर गुरबे, विश्वनाथ स्वामी यांनी मत व्यक्त केले. संचालक काशिनाथ कांबळे यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here