कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखाना कार्यस्थळावर सहकार भारती व जवाहर साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने नॅनो खतांचा वापर करण्यासाठी शेती विकास कार्यशाळा पार पडली. यावेळी आ. राहुल आवाडे, इचलकरंजी जनता बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, इफकोचे अशोक साबळे आदी उपस्थित होते. इफ्कोचे वरिष्ठ व्यवस्थापक महादेव पोवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जवाहर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक बांधवांना उत्पादन वाढीसाठी सहकार्य केले आहे, असे मत माजी आ. प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले. तर आमदार राहुल आवाडे यांनी जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून एफआरपीपेक्षा १२०० कोटी रुपये जास्त परतावा दिला आहे. सर्वांची देणी वेळेत चुकती करणारा जवाहर साखर सहकारातील एक रोल मॉडेल असल्याचे सांगितले. सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रमुख वैशालीताई आवाडे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांनी आभार मानले. सुभाष गोटखिंडे यांनी सूत्रसंचालन केले. केन कमिटीचे दादासो सांगावे, विजय बुणगे, अरुण काकडे, शिरीष देशपांडे, श्रीकांत पटवर्धन, संचालक सूरज बेडगे आदी उपस्थित होते.