कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले येथील दत्त साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर कृष्णात बाळू आंबेकर (वय ६०, रा. मांडुकली, ता. गगनबावडा) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. आंबेकर हे शेतातून घरी जात असताना त्यांना पाठीमागून दुचाकीने उडवले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ऊस गळीत हंगामात ऊसतोड मजुरांचा अपघाती विमा युनायटेड इंडिया विमा कंपनीच्या माध्यमातून उतरवला होता. कृष्णात आंबेकर यांच्या अपघाती मृत्यूनंतर तीन लाखांचा विम्याचा धनादेश युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांच्या हस्ते नातेवाईकांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी एच. आर. प्रमुख सुहास गुडाळे, मुख्य शेती अधिकारी संग्राम पाटील, चीफ इंजिनिअर शिवप्रसाद पडवळ, सिनिअर मॅनेजर शिवप्रसाद देसाई, एम. एम. पाटील, शिवाजी चौगुले, स्वप्निल चौगुले आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.