कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याची २०२४ ते २०२९ पंचवार्षिक निवडणूक दि. २३ रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १९ जागांसाठी १९ अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध झाली. याची अधिकृत घोषणा ३० नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे करणार आहेत. कारखाना स्थापनेपासून आतापर्यंतच्या ८ निवडणुका संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाल्या आहेत. उत्पादक सभासदातून सर्वसाधारण गटातून १४, महिला गटातून २, अनुसूचित जाती-जमाती गटातून १ तर बिगर उत्पादक व संस्था गटातून २ असे एकूण १९ संचालक निवडून द्यायचे होते. यामध्ये उत्पादक गट, महिला गट, अनुसूचित जाती-जमाती गट, बिगर उत्पादक व संस्था गटातून असे एकूण ४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघार घेतल्यानंतर १९ अर्जच शिल्लक राहिले. यावेळी ७ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
बिनविरोध निवडलेले संचालक असे : उत्पादक सभासदांतर्फे सर्वसाधारण संचालक कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे (इचलकरंजी), शीतल आमन्नावर (बोरगाव), सूरज बेडगे (हुपरी), बाबासो चौगुले (कुंभोज), गौतम इंगळे (कोथळी), अभयकुमार काश्मिरे (रुई), संजयकुमार कोथळी (अकिवाट), पार्श्वनाथ ऊर्फ सुनील नारे (बेडकिहाळ), आदगोंडा पाटील (हेरले), दरगोंडा पाटील (कोगे), प्रकाश पाटील (पट्टणकोडोली), सुनील पाटील (सिदनाळ), दादासो सांगावे (अब्दुललाट), सौ. कमल पाटील (सुळकुड), सौ. वंदना कुंभोजे (गौरवाड), अनुसूचित जाती/जमाती प्रशांत कांबळे (इचलकरंजी), बिगर उत्पादक व संस्था सभासदांतर्फे सुभाष जाधव (इचलकरंजी), आण्णासाहेब गोटखिंडे (यळगूड). निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे काम पाहत आहेत, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तेली काम पाहत आहेत.
विधानसभेला विजय, कारखानाही बिनविरोध…
आवाडे घराण्यातील तिसऱ्या पिढीला म्हणजे राहुल आवाडे यांना मतदारांनी विधानसभेत पाठवले. तो निकाल कालच लागला असून, आज कारखाना बिनविरोध झाला आहे. नातू राहुल याला जनतेने आमदारकी दिली, तर आजोबा कल्लाप्पाण्णा आवाडे व वडील प्रकाश आवाडे यांच्याकडे सलग आठव्या वेळी ‘जवाहर’ बिनविरोध करून सत्ता दिली आहे. आवाडे यांच्यावर जनतेने टाकलेला हा विश्वास आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.