कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची अचूकता तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने कुडित्रे येथील कुंभी-कासारी साखर कारखाना कार्यस्थावर अचानक भेट देऊन वजन काट्यांची तपासणी केली. कारखान्यातील पाच वजनकाट्यांची पडताळणी करण्यात आली. येथील काट्यावर उसाने भरलेल्या वाहनांचे व बैलगाड्यांचे भर वजन व रिकामे वजन तपासणी केली असता वजने अचूक असल्याचे निदर्शनास आले. सर्व वजन काटे बिनचूक वजन दाखवत असलेचा अहवाल नायब तहसीलदार पुंडलिक देसाई, भरारी पथकाने वाहन मालक, बैलगाडीवानांना दिला.
भरारी पथकामध्ये पुंडलिक देसाई, पल्लवी र. पालकर, सुशांत धनावडे, वि.व्यं. कासले, शरद जोशी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, सभासद प्रतिनिधी बापू पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक धिरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील, मुख्य शेती अधिकारी संजय साळवी, केनयार्ड सुपरवायझर संतोष देसाई उपस्थित होते. कुंभी कारखान्यावर ८० मेट्रिक टनाचा एक, ३० मेट्रिक टनांचे तीन आणि १० मेट्रिक टनाचा एक असे पाच वजनकाटे आहेत.