कोल्हापूर : हमीदवाडा, (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतुकीच्या कराराचा प्रारंभ करण्यात आला. व्हाईस चेअरमन आनंदराव फराकटे यांच्या हस्ते या कराराचा प्रारंभ झाला. फराकटे म्हणाले, करार करण्यात येणाऱ्या यंत्रणेस अॅडव्हान्स पहिला हप्ता एप्रिलअखेरीस देण्यात येणार आहे. पुढील गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गळीतासाठी आणण्याच्या दृष्टीने स्थानिक यंत्रणा करण्याचे धोरण ठरले असून, त्यादृष्टीने कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी करार करावेत.
यावेळी कार्यक्षेत्रातील वाहतूक कंत्राटदार बाबूराव पाटील, प्रल्हाद देवडकर, तानाजी पाटील, पुंडलिक रेपे, नामदेव रेपे, विश्वास निकम, सागर मानगावकर, सुभाष पाटील, नामदेव शिंदे, साताप्पा खोत, मारुती रेपे यांच्यासह सर्व तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी करार केले. कारखान्याचे संचालक विश्वासराव कुराडे, तुकाराम ढोले, भगवानराव पाटील-बानगेकर, बाळासाहेब चौगुले, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रताप मोरबाळे, सेक्रेटरी रावसाहेब बोंगाडें, अँग्री ओव्हरसिअर प्रवीण पाटील, धनंजय दारवाडकर, रामचंद्र मगदूम, सुशांत जाधव, केनयार्ड सुपरवायझर अनिल राऊत, मधुकर घोरपडे, नंदकुमार पाटील आदी उपस्थित होते.