कोल्हापूर: राजाराम कारखान्याच्या बॉयलरला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

कोल्हापूर: कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मिलला आग लागली. शुक्रवार सकाळी १०:४० च्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आगीत तीन सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत मोठे नुकसान झाले.

शहरातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. टर्बाइन पिटजवळील आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. राजाराम कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. भाजपचे आमदार अमल महाडिक कारखान्याचे अध्यक्ष आहेत. दोनच दिवसांपूर्वी कारखान्याचा गळीत हंगाम संपला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here