कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या आणि कारखान्याशी संलग्न सर्व घटकांच्या सहकार्यामुळे मागील गळीत हंगामात चांगले गाळप करण्यात आले. पुढील गळीत हंगामातील गाळपाचे अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्व ऊस दालमिया कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया भारत शुगर कंपनीचे युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी केले. कारखान्यात आयोजित मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते.
साखर कारखान्यात आगामी २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन युनिट हेड रंगाप्रसाद यांच्या हस्ते आले. कारखान्यात सर्व खाते प्रमुख व कर्मचाऱ्यांनी विधिवत सत्यनारायण पूजा केली. चिफ इंजिनिअर शिवप्रसाद पडवळ, एचआर प्रमुख सुहास गुडाळे, शेती अधिकारी श्रीधर गोसावी, शिवप्रसाद देसाई, संग्राम पाटील, संभाजी भोसले, कणक सबई, चिंतामणी पाटील, मुकुंद गुळवणी, बबन रेपे, रामचंद्र घराळ, मणिकंडन, मनिष अग्रवाल, प्रकाश पोवार, विलास शिंदे, एम. एम. पाटील, प्रकाश चौगुले, झुंजार पाटील आदी उपस्थित होते.