कोल्हापूर : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने विजय पाटील यांना ‘ऊस भूषण’ पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील डॉ. विजय शंकरराव पाटील यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘ऊस भूषण’ पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी पुणे येथे स्वीकारला. पाटील यांनी दक्षिण विभागात तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना कार्यक्षेत्रात को ८६०३२ वाणाचे एकरी १२४ (हेक्टरी ३१०.७३) टन विक्रमी उत्पन्न काढले. राज्यस्तरावरील ऊस स्पर्धेमध्ये पूर्ण तयारीने उतरून जोमदार उसाचे पीक आणले. तथापि, डॉ. विजय पाटील यांचे चार महिन्यांपूर्वी निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला.

विजय पाटील यांच्या पत्नी शोभा, मुले डॉ. पृथ्वीराज व अभिजित, भाऊ संजय, बाळासाहेब आणि राजू पाटील आदींना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘ऊस भूषण’ पुरस्काराचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात आले. तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे अध्यक्ष विनय कोरे, कार्यकारी संचालक भगत, मुख्य शेती अधिकारी प्रमोद पाटील, ऊस विकास अधिकारी सुभाष करडे, मंडल अधिकारी वीरेंद्र पाटील, त्याचबरोबर अनिकेत केकरे, धनाजी पाटील, शरद पाटील यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here