कोल्हापूर : सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याकडून ३१०० रुपयाप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा : चेअरमन, प्रा. संजय मंडलिक

कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात दि. ५ ते १५ डिसेंबर या पंधरवड्यात गाळपास आलेल्या उसास प्रतिटन ३१०० रुपयांप्रमाणे ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहेत. ऊसतोडणी-वाहतुकीची बिलेही संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली. चालू हंगामात दि. ५ ते १५ डिसेंबर या पंधरवड्यात गाळपास आलेल्या ३२३२७.१६७ मे. टन उसाची प्र. टनास ३१०० रुपयांप्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम १० कोटी २ लाख १४ हजार ३१२ संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली असून, वरील कालावधीतील ऊसतोडणी-वाहतुकीची बिले ही संबंधितांचे बँक खात्यावर वर्ग केली आहेत.

कारखान्याने सर्वांच्या सहकार्याने आजअखेर २७ दिवसांमध्ये १,०२,९५५ मे. टन उसाचे गाळप झाले असून, १,०५,७५० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.२६ टक्के इतका आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून ३९,८६,१०० युनिटस् वीज निर्यात केली आहे. यापुढेही सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास पाठवावा, असे आवाहन मंडलिक यांनी केले आहे. यावेळी व्हा. चेअरमन आनंदा फराकटे, संचालक शिवाजीराव इंगळे, प्रकाश पाटील, विश्वास कुराडे, कैलाससिंह जाधव, धनाजी बाचणकर, प्रदीप चव्हाण, कृष्णा शिंदे, सत्यजित पाटील, तुकाराम ढोले, पुंडलिक पाटील, प्रा. संभाजीराव मोरे, महेश घाटगे, मंगल तुकान, नंदिनीदेवी घोरपडे, प्रतिभा पाटील, नेताजी पाटील, विष्णू बुवा आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील उपस्थित होते.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here