कोल्हापूर : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला नॅशनल कोजन पुरस्कार वितरण कार्यक्रमांमध्ये ‘स्पेशल कॅटेगरी कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स अॅवॉर्ड’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे पुणे येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण झाले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, सरव्यवस्थापक संजय शामराव घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संयोजक संजय खताळ, जयप्रकाश दांडेगावकर आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बी. ए. पाटील यांना व्यवस्थापकीय विभागातून ‘बेस्ट इलेक्ट्रिक मॅनेजर’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, ‘घोरपडे कारखान्याला आत्तापर्यंत केंद्रीयस्तरावरील तसेच ‘मेडा’कडून गेल्या दहा वर्षांत पाच पारितोषिके मिळाली. पूर्ण ‘सरसेनापती संताजी ग्रुप’च्या मेहनतीमुळे हे शक्य झाले असून, संस्थापक हसन मुश्रीफ, सर्व सहकारी संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे हे संघटित यश आहे.