कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील ४० साखर कारखान्यांनी नुकत्याच संपलेल्या हंगामात २ कोटी ४० लाख ८२ हजार ७४१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. मात्र, सरासरी उताऱ्यात १.७१ टक्के घट झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. सांगली जिल्ह्यात १.९१ टक्के उताऱ्यात घट झाली आहे. कोल्हापूर विभागात १.७१ टक्के सरासरी साखर उताऱ्यात मोठी घट झाली आहे. १.७१ टक्के घट झाल्याने १०.२५ टक्के उताऱ्यापुढील प्रत्येक टक्क्याला मिळणाऱ्या ३१५ रुपयांचा विचार केल्यास ५३९ रुपयांचा फटका बसणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ११.३ सरासरी उताऱ्यासह एक कोटी ४१ लाख ८८६ क्विंटल साखर उत्पादन केले. तर सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ८८ लाख ३३ हजार २४५ हजार ४२० मेट्रिक टन गाळप केले आहे. ११.७३ टक्के सरासरी साखर उताऱ्यासह १ कोटी ७८ लाख २५ हजार ५५९ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. मागील वर्षीच्या साखर उताऱ्यात १.७१ टक्के उताऱ्यात घट झाली आहे. शेतकरी संघटनेचे नेत्यांनी ही साखर उताऱ्यातील घट शेतकऱ्यांना ऊसदरासाठी मारक ठरणार असल्याने संताप व्यक्त केला. साखर कारखान्याचे उतारा घटीत षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.