कोल्हापूर : ऊस तोडणीवेळी शेतकऱ्यांची लुट रोखण्यासाठी साखर सहसंचालकांनी बनवला व्हॉट्सॲप ग्रुप

कोल्हापूर : ऊस तोडीसाठी मागितली जाणारी खुशाली, त्या माध्यमातून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी शिरोळ येथे साखर कारखाना प्रतिनिधी, आंदोलन अकुंश संघटना यांची प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या पढाकाराने बैठक झाली. यावेळी खुशाली रोखण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याचे ठरले होते. यानुसार सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी ग्रुप तयार केला. इन्ट्री-खुशाली क्रमपाळी तक्रार निवारण असे या ग्रुपला नाव दिले आहे. या ग्रुपवर पहिल्या दिवशी दत्त- शिरोळ व आवाडे- हुपरी या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील दोन शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी शिरोळ तालुक्यात प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्या पुढाकाराने संघटना, साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. यात दत्त शिरोळ, आवाडे हपरी, पंचगंगा इचलकरंजी, शरद नरंदे व गुरुदत्त टाकळीवाडी या कारखान्यांचे कार्यकारी संचालक व शेती अधिकारी आणि आंदोलन अंकुश संघटनेचे दोन प्रतिनिधी, प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयाचे तीन प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी दत्त- शिरोळ व आवाडे- हुपरी कारखाना कार्यक्षेत्रातील दोन शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. याची शहानिशा कारखाने करणार असून, संबंधित वाहतूकदाराच्या बिलातून पैसे कापून ते परत केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना आंदोलन अंकुश संघटनेकडे तक्रारी कराव्यात. आम्ही त्याचा पाठपुरावा करू, ज्याच्याकडून पैसे घेतले असतील त्यांनी कोणतीही भीती न ठेवता संपर्क करावा, असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here