कोल्हापूर : नव्या वेतन करारप्रश्नी संपावर जाण्याचा साखर कामगारांचा इशारा, कुंभी-कासारी कारखान्याला निवेदन

कोल्हापूर : साखर कामगारांच्यावेतनवाढीचा नवा करार व्हावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी १६ डिसेंबर पासून साखर कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली. राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढ कराराची मुदत ३१ मार्च रोजी संपली आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने नवीन वेतनवाढ करिता त्रिपक्षीय समिती नेमणूक करण्यासाठी राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. पण चालढकल सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे याबाबत कुंभी-कासारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने व सचिव प्रशांत पाटील यांना पत्र देण्यात आले. याप्रश्नाबाबत राज्यातील सर्व साखर कारखान्यांना पत्र देण्याची व शासन, साखर आयुक्तांना सर्व कारखाना प्रशासनाने कळवून हा प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी रावसाहेब पाटील, शंकरराव भोसले, उपाध्यक्ष गोरख पाटील, कामगार प्रतिनिधी दीपक चौगुले, अतुल नाळे, संजय आडनाईक, नामदेव पाटील, अविनाश पाटील, सरदार पाटील आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here