कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आपले गाळप संपुष्टात आणण्यास सुरुवात केली आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या अहवालानुसार, ८ एप्रिल २०२१ पर्यंत सोलापूर विभागातील सर्व ४३ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३५ कारखाने बंद झाले आहेत. महाराष्ट्रात एकूण ११८ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे.
साखर उताऱ्याच्या बाबतीत राज्यात कोल्हापूर सर्वात आघाडीवर आहे. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २७ मार्च २०२१ अखेर कोल्हापूरचा साखर उतारा १२ टक्के आहे.
चालू हंगामात कोल्हापूर विभागात ३७ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. सोलापूर विभागात ८ एप्रिलअखेर सर्वाधिक ४३ कारखान्यांनी गाळप केले आहे. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ८ एप्रिल २०२१ अखेर १८८ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला. राज्यात ९८१.६१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. एकूण १०२७.७५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४७ टक्के इतका आहे.