कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्यावर्षी चक्काजाम करत आधीच्या हंगामात तुटलेल्या उसाला प्रति टन अतिरिक्त 400 रुपये देण्याची मागणी केली होती. अनेक आंदोलनांनंतर जिल्हाधिकारी व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने दराचा तोडगा निघाला होता. हे पैसे शेतकऱ्यांना देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना प्रती टन 50 व 100 रुपये असा दरफलक मिळणार आहे. दिवाळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांना ११२ कोटी रुपये मिळणार असल्याने सणाच्या आनंदात भर पडणार आहे.
गतवर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये मिळावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुश संघटनेकडून सातत्याने केली जात होती. यासाठी राजू शेट्टी यांनी ऑगस्ट महिन्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. बारामतीमधील साखर कारखान्याने 562 रुपये जादा दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडून 400 जादा मिळावेत, अशी मागणी होती. यावर 3000 रुपये दरानुसार 100 रुपये व 3000 पेक्षा अधिक दर दिला असेल तर 50 रुपये प्रती टन देण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 112 कोटी 65 लाख 58 हजार 550 रुपये जमा होणार आहेत.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.