कोल्हापूर : सोनवडे-बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिल्हा बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत विविध गटांतील २१ जागांसाठी ३४ अर्ज दाखल झाले असून सोमवारी (दि. २७) छाननी होणार आहे.
गायकवाड कारखान्यासाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नसल्याने निवडणूक बिनविरोधची शक्यता ठळक झाली. उत्पादक तीन जागांसाठी चार व पाच अर्ज दाखल आहेत. राखीव गटातही एका जागेसाठी दोन अर्ज असून, यातील बहुतांश अर्ज दुबार आहेत. सोमवारी छाननी होत असून ११ फेब्रुवारीपर्यंत माघारीची मुदत आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.