कोल्हापूर: ऊसाचे गाळप होणे बाकी असल्याने कारखान्यांनी लवकरात लवकर गाळप करावे, यासाठी जिल्ह्यातील आठ साखर कारखाने सुरुच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
जिल्ह्यात 22 कारखाने असून 14 कारखाने बंद झाले आहेत. साडेपाच लाख ऊसाचे गाळप होणे बाकी असून शिरोळ तालुक्यात दत्त सहकारी साखर कारखाना आणि हातकणंगले तालुक्यातील जवाहर साखर कारखान्याचा हंगाम आणखीन 12 ते 13 दिवस सुरू राहणार आहे. अन्य सहा कारखान्यांचा हंगाम चार ते आठ दिवसात टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे. कारखान्याचा हंगाम संपण्यासाठी सुरू ,असलेल्या कारखान्यांनी अन्य कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप करावे, यासाठी प्रयत्न करावेत. लॉकडाऊन काळात ऊसतोडणी कामगार आणि ऊस वाहतूक करणार्या वाहनांना बंदीतून सूट दिली जाणार आहे, असेही जिल्हाधिकार्यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक साखर संचालक अरुण काकडे उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.