क्रांती साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्याने पिकवला १३१ मे. टन ऊस

सांगली : येथील क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या पथदर्शी प्रकल्पातून शेतकरी उदय लाड यांनी एकरी १३१.४३४ मे. टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेतले आहे. कारखान्याने उच्चांकी उत्पादन घेतले आहे. साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी उच्चांकी ऊस उत्पादन घेणारे शेतकरी उदय लाड यांच्या शेतावर जाऊन त्यांचे कौतुक केले. यंदा प्रतिकूल हवामान असतानाही कारखान्याने पुरवलेले तंत्रज्ञान, योग्य सल्ला आणि चिकाटीच्या जोरावर हे उत्पादन शेतकऱ्याने घेतले आहे.

क्रांती कारखान्याच्या पायलट योजनेतून उदय लाड यांनी गेल्यावर्षी ३ जून रोजी आडसाली हंगामात दीड एकर क्षेत्रावरको-८६०३२ या जातीची ऊस लागण केली. नांगरट, रोटर अशी पूर्व मशागत करून, माती परीक्षण केले. लागणीपूर्वी एकरी २ ट्रेलर क्रांती कंपोस्ट व १५ डंपिंग ट्रेलर शेणखताचा वापर केला. तागाचे पिक हिरवळीचे खत म्हणून घेतले. लागणीसाठी कारखान्याच्या बेणेमळ्यातील प्रमाणित बेणे, बेणे प्रक्रिया करुन वापरले. लागणीपूर्वी रासायनिक खतांचा डोस दिला. जैव सेंद्रिय खते वापरली. विद्राव्य खते उसाच्या १२ महिने वयापर्यंत दिली. मी नेहमी एकरी ७५ ते ८० मे. टन उत्पादन घेत. मात्र, क्रांती कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या योजनेतून पहिल्याच प्रयत्नात उच्चांकी यश मिळवले, असे शेतकरी उदय लाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here