सातारा जिल्ह्यात गाळप व साखर निर्मितीत कृष्णा कारखान्याची आघाडी

सातारा : जिल्ह्यात गाळप व साखर निर्मितीत कृष्णा कारखान्याने आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक १० लाख १३ हजार ८५० टन उसाचे गाळपाद्वारे १० लाख ७७ हजार ६० क्विंटल साखर निर्मिती केली आहे.गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सहकारी व खासगी १७ साखर कारखान्यांनी ७२ लाख ८८ हजार ७२० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. आतापर्यंत ७२ लाख २४ हजार ५२६ टन उसाचे गाळप झाले आहे.

जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाचे तीन महिने पूर्ण झाले आहेत. एकूण १७ कारखान्यांकडून गाळप सुरू असून यामध्ये सहकारी नऊ व खासगी आठ कारखान्यांचा समावेश आहे. सध्या खासगी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.९९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आतापर्यंत १७ साखर कारखान्यांनी ७२ लाख २४ हजार ५२६ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७२ लाख ८८ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कराखान्यांस चांगला साखर उतारा मिळत आहे.सहकारी साखर कारखान्यांना सर्वाधिक सरासरी ११.१ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here