‘व्हीएसआय’तर्फे कृष्णा कारखाना, जयवंत शुगर्सचा उत्कृष्ट पुरस्काराने गौरव

सातारा : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यास कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर धावरवाडी येथील जयवंत शुगर्सला दक्षिण विभागात तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात माजी कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप व ‘जयवंत शुगर्स’चे विनायक भोसले यांच्यासह दोन्ही कारखान्यांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

जयवंत शुगर्सचे सुर्ली (ता. कोरेगाव) येथील शेतकरी सुहास पाटील यांना दक्षिण विभागातील ऊस भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाटील यांनी पूर्व हंगामात प्रती हेक्टरी २९९.२४ मेट्रिक टन ऊस उत्पादन घेतले आहे. पुरस्कार वितरणप्रसंगी व्हीएसआयचे उपाध्यक्ष तथा सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार बाळासाहेब पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, शिवाजीराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणारी जयवंत आदर्श कृषी योजना आणि जयवंत शुगर्सने उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठी स्वतःमध्ये केलेले बदल यामुळे दोन्ही कारखान्यांना पुरस्कार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here