कोल्हापूर : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना सर्व यंत्रणा वेळेत जोडणी करून गळीतासाठी सज्ज केली आहे. कारखान्याने यंदाच्या हंगामात ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गाळपास येणाऱ्या उसाला चांगला दर देण्यास कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी केले. कुडित्रे (ता. करवीर) येथे कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या ६२ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभप्रसंगी ते बोलत होते. संचालक सर्जेराव दिनकर हुजरे आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई हुजरे यांच्या हस्ते पूजन व बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
दरम्यान, चेअरमन चंद्रदीप नरके, व्हा. चेअरमन राहुल खाडे व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते को जनरेशन प्रकल्पाचा बॉयलर अग्निप्रदीपन झाला. यावेळी कार्यस्थळावर सर्व संचालक मंडळ, कामगार प्रतिनिधी, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील, सर्व विभागप्रमुख, कुंभी बँकेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.