कुशीनगर : उस शेतकर्यांचे पूर्ण पैसे दोन आठवड्यात न दिल्यास साखर कारखान्यांचे गोदाम सील केले जातील. उस विभागाने खड्डा, रामकोला, कप्तानगंज, सेवरही व ढाढा साखर कारखान्याला यासाठी नोटीस दिली आहे.
जनपद येथील कारखान्यांनी 318.80 लाख क्विंटल उसाचे गाळप केले. हंगाम संपल्याच्या एक महिन्यानंतर शेतकर्यांना 66.20 टक्केच पैसे भागवले आहे, तर आतापर्यंत 90 टक्के पैसे भागवले जायला हवे होते. शासनाने देखील गाळप संपल्याच्या 14 दिवसांच्या आत पैसे भागवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, पण त्याचे पालन होत नाही. कप्तानगंज साखर कारखाना आतापर्यंत 39.61 टक्के, ढाढा कारखाना 76.27, खड्डा 55.35, रामकोला 73.63 तर सेवरही कारखान्याने 63.90 टक्के पैसे भागवले आहेत.
जिल्हा उस अधिकारी वेद प्रकाश सिंह यांनी सांगितले की, कारखाना व्यवस्थापकाने नोटीस देवून दोन आठवड्यांची मुदत दिलेली आहे. यामध्ये हालगर्जीपणा करणार्यांविरोधात कडक कारवाई होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.