कुशीनगर: कस्बा स्थित त्रिवेणी साखर कारखान्यात मंगळवारी सकाळी आपल्या क्षेत्रातील 83 लाख क्विंटल ऊस गाळप करून करून ,सीजन बंद केला आहे. महाव्यवस्थापक अनिल कुमार त्यागी यांनी सांगितले की, 15 नोव्हेंबर पासून गाळप हंमागाचा शुभारंभ झाला आणि 28 एप्रिल ला समारोप करण्यात आला. लॉकडाउनच्या दरम्यान फिजिकल डिस्टेंसिंग चे पालन करत गाळप सुरु ठेवले. शासनाच्या सुचनांनुसार शेतकर्यांना ऊसाचे पैसेही दिले गेले. चार महिने 13 दिवस साखर कारखाना सुरु होता. फॅक्टरी मॅनेजर मानवेंद्र राय यांनी सांगितले की, कर्मचारी आणि अधिकार्यांनी सरकारच्या निर्देशांचे पालन करावे. शेतकर्यांचे हित पाहून क्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.