उत्तरप्रदेशमध्ये साखर कारखाना करणार ऊस बियाणावर नि:शुल्क प्रक्रिया

कुशीनगर(उत्तरप्रदेशमध्ये) : ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी बियाणे चांगले असणे महत्वाचे आहे. शेतकर्‍यांच्या ऊसाच्या बियाण्यावर मोफत प्रक्रिया करण्यासाठी करनालमधून मशीन मागवण्यात आले आहे. याचा फायदा शेतकर्‍यांना मिळेल. शेतकर्‍यांनी केवळ वरच्या क्षेत्रामध्ये 0238, 0118 याच प्रजाति च्या ऊसाची पेरणी करावी, असे ऊस संचालक पी.एन. शाही यांनी सागितले.

हतवा गावातील सेवरही साखर कारखाना परिसरात कृष्ण बिहारी मिश्र यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ऊस महासंचालक शरद सिंह यांनी ऊसा बरोबर इतर पिकांची शेती, त्यावर लागणारे रोग, रोगांची ओळख तसेच नियंत्रण, लागवड करण्याची पद्धत, त्यामुळे होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच इतरही पिके घेवून अर्थिक उत्पन्न दुप्पट होवू शकते, असेही सांगितले. चार फूटावर सीओ 0118 हा ऊसाचा एक डोळा असणार्‍या बियाण्याचा एक़ तुकडा लावल्यावर 100 ग्रॅम बुरशीनाशक व टाइकोडरमा यांना अनुदान दिले जाईल. या बियांना साखर कारखान्याकडून मिळणार्‍या औषधाची फवारणी करावी. यावेळी उपेंद्र सिंह, केदार यादव,, चुमन सिंह, कन्हैया, रामाशीष, हीरालाल, रजेश, सतीश, विनोद, अनिल सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here