तमकुहीरोड : सेवरही साखर कारखान्याने सोमवारी आपल्या गळीत हंगामाची समाप्ती केली. या हंगामात कारखान्याने १५१ दिवस ऊस गाळप करून एकूण ७९.१३ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. चालू हंगामात सेवरही कारखाना गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आला होता. त्याआधीच्या हंगामात कारखान्याने १५७ दिवसांमध्ये ७८.९८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगाम समाप्ती प्रसंगी कारखाना प्रशासनाने हंगामातील सहकार्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानले. पुढील हंगामासाठीच्या तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला. कारखान्याचे कार्यकारी संचालक योगेंद्र प्रताप सिंह, ऊस विभागाचे महाव्यवस्थापक प्रमोद कुमार, इंजिनीअरिंग विभागाचे सरव्यवस्थापक संदीप सिंह, ऊस व्यवस्थापक पी. एन. शाही, कारखान्याचे व्यवस्थापक यशवंत सिंह बघेल, कामगार नेते प्रेमशंकर सिंह, चीफ इंजिनीअर दीपक श्रीवास्तव, प्रॉडक्शन मॅनेजर दिलीप मिश्र, वाणिज्य सरव्यवस्थापक महेश अग्रवाल, सुरक्षा अधिकारी अमित कुमार राय आदी उपस्थित होते.