बिश्केक : अँटिमोनॉपॉली रेग्युलेशन सर्व्हिसमध्ये आयोजित एका बैठकीत साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांनी २०२४ मधील बीट उत्पादनाबाबत चर्चा केली. किर्गिझस्तानमध्ये २०२४ मध्ये देशाच्या साखरेची गरज ७५ टक्क्यांपर्यंत भागवू शकेल इतके बीटचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे असे सांगण्यात आले. तर जल संसाधन, कृषी आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने २०२४ मध्ये ९,००,००० टन बिटचे उच्चांकी उत्पादन होण्याचे अनुमान व्यक्त केले आहे.
या बीटपासून कमीत कमी १,१०,००० टन साखरेचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. हे उत्पादन म्हणजे देशाच्या साखरेच्या गरजेचा ९२ टक्के हिस्सा आहे. मंत्रालयाने अद्याप साखरेच्या आयातीवर निर्बंध लागू करण्याची योजना तयार केलेली नाही. कारण शेजारील देशांमध्ये साखरेच्या किमती कमी आहेत. मात्र, शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी नंतर यावर निर्बंध लावले जाऊ शकतात. २०२२ मध्ये किर्गिझस्तानमध्ये ३२,९०० मेट्रिक टन बिटचे उत्पादन घेण्यात आले होते.