भिष्केक : किर्गिस्तान सरकारने साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. कृषी, पाणी पुरवठा आणि क्षेत्रिय विकास मंत्री आस्करबेक यांनी ही घोषणा केली.
मंत्र्यांनी सांगितले की, देशात उत्पादन झालेल्या साखरेचा तुटवडा रोखण्यासाठी आणि त्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. पंतप्रधानांनी देशातून तेल आणि साखर निर्यातीवर बंदी घालणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
ते म्हणाले, या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठ आणि खाद्य सुरक्षेवर सकारात्मक परिणाम होईल. देशात आटा, साखर, वनस्पती तेल यांचा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.