कोरोना वायरस मुळे लागू केलेल्या लॉकडाउनमुळे साखर उद्योग संकटात सापडला आहे. लॉकडाउन असल्याने हंगाम घाई गडबडीत उरकण्यात आला आहे. आता आगामी हंगामासाठी तांत्रिक दुरुस्ती खोळंबली आहे. लॉकडाउनमुळे सुटे भाग, तंत्रज्ञ, कुशल मजूरांचा अभाव असल्याने कारखान्यांची तांत्रिक दुरुस्ती ठप्प झाली आहे.
कारखान्यांच्या तांत्रिक दुरुस्ती साठी लागणारे साहित्य लॉकडाउनमुळे लवकर मिळणार नाहीत. हे साहित्य उशिरा मिळाल्यास दुरुस्तीचे कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत याचीही भीती आहे. तसेच इलेक्ट्रिकल मोटर्स पॅनेल, पॉवर टर्बाईन आदी दुरुस्तीची, देखभाल करणारे तंत्रज्ञान, कामगार परराज्यातील, परजिल्ह्यातील आहेत. ही मंडळी दुरुस्ती कामासाठी नियोजित स्थळी पोहचू शकत नाहीत. या साऱ्याचा परिणाम गाळपावर होण्याची शक्यता आहे.
बॉयलरची तपाणी करुन करायची आवश्यक कामे तसेच इतर सर्व मशिनरींचे सुटे भाग आणि देखभाल व दुरुस्तीविषयक कामे यांचे मागणीपत्र भरणे, त्यानंतर निविदा मागवणे, दरपत्रके घेणे, किमतीचे तुलनात्मक तक्ते तयार करणे, संबंधित समितीची बैठक घेणे व नंतरच कामाच्या ऑर्डर देणे या बाबी सहकारी साखर उद्योगाला बंधनकारक आहेत.
ही कामे कारखाने उघडल्यावरच होणार आहेत. यासोबतच बॉयलरच तपासणी कामे, वजनकाटे दुरुस्ती आणि कॅलिब्रेशन, फ्लो मीटर्स कॅलिब्रेशन, इलेक्ट्रिकल इनस्पेक्शन आदी शासकीय नियामप्रमाणे दरवर्षी करणे बंधनकारक आहेत. याबरोबरच प्रत्येक ऊस नोंदीचीही कामे थांबणार आहेत. या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या ऊस गाळप हंगामावर नक्कीच होणार आहे असे चित्र सध्या दिसत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.