लखीमपूर : बजाज हिंदुस्थान साखर कारखान्यात रॅपिड कोविड-19 टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये कारखान्यातील 35 कर्मचारी आणि अधिक़ार्यांची टेस्ट करण्यात आली. टेंस्टमध्ये सर्वांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. साखर कारखाना कॅम्पस मध्ये स्थित बजाज पब्लिक स्कूलमध्ये सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत तपासणी सुरु होती. लखीमपूर येथून आलेले डॉ. नुसरत अली, लॅब टेक्नीशियन शिव पांड्ये, गुफरान, सोनी शर्मा तसेच साखर कारखान्याचे डॉ. मयंक गुप्ता व लालता प्रसाद यांच्या टीमने सर्वांची तपासणी केली आणि आवश्यक सल्ला दिला. तपासणीमध्ये सर्व लोक निगेटीव्ह आले. साखर कारखान्याचे युनिट हेड प्रदीप कुमार सालार यांनी सांगितले की, सर्व कर्मचार्यांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी आणि वेळेवर कोविड -19 ची टेस्ट करावी. त्यांनी सर्वांना मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, कारखान्याच्या सर्व गेटवर थर्मल स्क्रिनिंग च्या माध्यमातून ताप असल्याची तपासणी करण्यात येत आहे तसेच सर्व कर्मचारी आणि अधिकार्यांचे सॅनिटायझेशन केले जात आहे, जेणेकरुन सर्व लोक सुरक्षित राहतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.