नवी दिल्ली: भारतामध्ये आता कोरोना संक्रमितांची संख्या वाढण्यापेक्षा, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात 86,961 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, 1,130 लोकांचा मृत्यु झाला आहे. तर 24 तासात 93,356 इतके रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना चे आतापर्यंत एकूण पॉजिटिव 54.87 लाख रूग्ण समोर आले. ज्यापैकी 43.96 लाख रुग्ण बरे झाले आणि 87,882 लोकांचा मृत्यु झाला. या बरोबरच रिकवरी रेट दर 80.11% झाला आहे. भारतात रिकवरी रेट सातत्याने वाढत आहे.
देशामध्ये गतीने वाढणाऱ्या कोरोना रूग्णांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. देशामध्ये कोरोनाचे सर्वात जास्त आकडे 7 राज्यात आहेत. पंतप्रधान पुढच्या आठवड्यात या राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशा परिस्थितीत आता ही परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्वत: कमांड घेण्याचा निर्णय घेतला आहे.
23 सप्टेंबरला सर्वात जास्त प्रभावित 7 राज्यातील सीएम वीडियो कॉन्फ्रेंसिंग च्या माध्यमातून बोलतील. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, यूपी सह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री बैठकी मध्ये सहभागी होतील. या बैठकीत कोरोना पासून निपटण्याच्या प्रकारांवर चर्चा करुन धोरण बनवले जाईल.