लातूर : लातूरच्या आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या दिशा प्रतिष्ठानला निवाडा येथील रेणा साखर कारखान्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून अत्याधुनिक सुविधांनीयुक्त रुग्णवाहिका भेट देण्यात आली. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे विधिवत पूजन करून दिशा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अभिजीत देशमुख, अध्यक्ष सोनू डगवाले यांच्याकडे किल्ली सुपूर्द करण्यात आली. मांजरा साखर परिवारातील रेणा कारखान्याच्या या दातृत्वाचे कौतुक होत आहे.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मांजरा साखर कारखाना सुरु झाला. मांजरा परिवाराचा नावलौकिक देशात आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रेणा साखर कारखाना सुरु झाला. या कारखान्याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले आहे. आता आरोग्य सेवेत कार्यरत दिशा प्रतिष्ठानला फिरती रुग्णवाहिका भेट दिली आहे.
आमदार धीरज देशमुख, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, माजी आमदार अॅड. त्रिंबक भिसे, माजी चेअरमन आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, दिशा प्रतिष्ठानचे डॉ. अशोक पोद्दार, डॉ. चेतन सारडा, इसरार सगरे, जब्बार पठाण, प्रसाद उदगीरकर, धनराज देशमुख, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रेमनाथ आकनगिरे, संग्राम माटेकर, प्रवीण पाटील, शहाजी हाके, तानाजी कांबळे, संभाजी रेड्डी, सचिन हरिदास, वैशालीताई माने, अमृता देशमुख, संचालक अनिल कुटवाड, लालासाहेब चव्हाण, बी. व्ही. मोरे, चाँदपाशा इनामदार, ज्ञानेश्वर भिसे, मनोज पवार आदी उपस्थित होते.