लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून कारखान्याने हंगाम २०२३-२४ मध्ये गाळप केलेल्या उसापोटी १०० रुपयांचा अंतिम हप्ता देण्यात आला आहे. कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या बँक जमा हे पैसे जमा करण्यात आले आहेत. दसरा, दिवाळी सणानिमित्त कारखान्याकडून सभासदांना ५० किलो साखर २५ रुपये प्रती किलो सवलतीच्या दराने १ ते १० ऑक्टोबरपर्यंत विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.
एफआरपीनुसार ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता कारखान्याची अंतिम एफआरपी २,५०५ रुपये झाली. परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून चेअरमन व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी कारखान्याच्या नफ्यातून एफआरपीपेक्षा प्रती मे. टन १९५ रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतला. कारखान्याने आधी २६०० रुपये दर दिला आहे. आता उर्वरीत १०० रुपये दिले जात असल्याचे सांगण्यात आले. सणासुदीच्या काळात सदरचा हप्ता मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.