लातूर : मांजरा साखर कारखाना देणार प्रती टन २०५ रुपयांचा अंतिम हप्ता

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ यशस्वी झाला. मांजरा परिवाराचे प्रमुख, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी हंगामात कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या ऊसासाठी किमान ३००० रुपये प्रति मेट्रिक टन ऊस दर देण्याचे जाहीर केलेले होते. कारखान्याने आधीच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रति टन २८०० रुपये अदा केलेले आहेत. आता प्रति टन रु. २०५ रुपयांचा ऊस बिलाचा अंतिम हप्ता ऊस पुरवठादारांच्या खात्यावर होणार आहे. त्यामुळे कारखान्याने एकूण ३००५ रुपये अंतिम ऊस दर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

चालु गाळप हंगाम कारखान्याचे चेअरमन व मांजरा परिवाराचे प्रमुख, मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्या नियोजन व मार्गदर्शनाने सुरळीत पार पडला आहे. कारखान्याने हंगामामध्ये ३,२३,६०१ मे. टन उसाचे गाळप केले. एकूण ३,१६,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. कारखान्याने १,९१,२९,५४३ केडब्ल्यूएच विजेची वीज वितरण कंपनीस निर्यात केली. ज्युस सिरप व बी हेवीसह सरासरी साखर उतारा ११.८६६ टक्के मिळाला आहे. अर्कशाळा विभागाने ६२,२४,६२० लिटर आरएस व ४४,४८,७५६ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here