लातूर:माजी मंत्री तथा जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी तळेगाव येथे जागृती शुगर अँड अलॉइड इंडस्ट्रीजच्या २०२४-२५ या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन करण्यात आले.माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत जागृती शुगर कारखानास्थळी मांजरा साखर परिवारातील साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याच्यावतीने विविध टप्प्यांवर तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अॅड.त्रिंबक भिसे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, मारुती महाराज कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, ‘रेणा’चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके, गणपतराव बिराजदार, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील- नागराळकर, सरव्यवस्थापक गणेश येवले यांची उपस्थिती होती.