लातूर : मांजरा परिवारातील रेणा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी पालकमंत्री, आमदार अमित देशमुख, माजी आमदार व लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडून आलेल्या नूतन संचालक मंडळातील सदस्यांचा धीरज देशमुख यांनी सत्कार करण्यात आला.
बाभळगाव येथे एका अनौपचारिक कार्यक्रमात नूतन संचालक मंडळातील सदस्यांनी देशमुख यांची बुधवारी भेट घेतली होती. याप्रसंगी सर्व संचालक मंडळास देशमुख यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास माजी आमदार त्र्यंबक भिसे, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, अनंतराव देशमुख, संग्राम माटेकर, धनराज देशमुख, गोविंद पाटील, सतीश पाटील, शंकरराव पाटील, तुकाराम कोल्हे, रणजित पाटील, बालाजी हाके यांच्यासह रेणापूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.